TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

मोशी येथे महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

  • ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमली शिवमंदिरे

मोशी: मध्यरात्रीपासून सुरू झालेले धार्मिक विधी, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग, विद्युत रोषणाई, मंदिरात अंखड सुरू असलेल्या ‘ओम नम: शिवाय’ या नामस्मरणामुळे भारावलेल्या वातावरणात मोशीतील हिंगणे सरकारनगर परिसरातील शिव मंदीरात भाविकांनी महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली.

‘बम बम भोले…’, ‘हर हर महादेव…’, ‘ओम नम: शिवाय’च्या गजरांनी शहरातील महादेव मंदिरे दुमदुमून गेली. शिवमंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली होती. रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेली ही मंदिरे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. दिवसभर महारुद्र अभिषेक, होमहवन, महाप्रसाद, कीर्तन, व्याख्यान असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त मोशी परिसरातील विविध महादेव मंदिरांच्या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.

मोशी परिसरातील हिंगणे सरकारनगर परिसरातील शिव मंदीराला एक तप पूर्ण होते आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हे शिव मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्य़ा होत्या. मंगेश हिंगणे मित्र परिवारावाकडून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यातआली होती. या मंदीरामध्ये मागील बारा वर्षापासून संदीप भालेराव गुरुजी आणि राम हिंगणे सेवा देत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button