breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावलं

युक्रेनवर रशियाने हल्ला चढवला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष चांगलाच वाढला आहे. काहीही झालं तरी आपण हटणार नाही असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं आहे. अशात तिथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे एस. जयशंकर यांनी?

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की युक्रेनमधून सुखरूप घेऊन २१९ विद्यार्थ्यांना घेऊन निघालो आहोत. रोमानियातून मुंबईच्या दिशेने पहिलं फ्लाईट रवाना झालं आहे. आमची पथकं विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. मी व्यक्तीगत पातळीवर या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे.

रशियाकडून कीववर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. शनिवारी राजधानी कीवच्या दक्षिण-पश्चिम भागात रशियाने दोन मिसाईल हल्ले केले. कीवमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असून, आकाशात रशियन लढाऊ विमानं घिरट्या घालताना दिसत आहे. त्यामुळे युक्रेनच्या नागरिकांमध्ये प्रचंड भीती वातावरण निर्माण झालं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारासच गोळीबार सुरू झाल्यानं नागरिकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाण आसरा घेतला आहे.

रशियाने कीवमध्ये दोन मिसाईल हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. कीवमधील स्थानिक प्रशासनाने याची माहिती दिली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाने डागलेली मिसाईल नागरी वसाहतीतील बहुमजली इमारतीवर पडल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आणखी एक मिसाईल राजधानीतील जुलियानी विमानतळावर कोसळली आहे. सध्या कीवमधील एका इमारतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मिसाईल हल्ल्यामुळे इमारतीचं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

काय आहे युक्रेन आणि रशियामधला वाद?

1991 ला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेन हा स्वतंत्र देश झाला. युक्रेन हा युरोपमधला दुसरा मोठा देश ठरला आहे. या देशात मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन आहे. तसंच या देशातल्या उद्योग व्यवसायही भरभराटीला आलेला आहे. युक्रेनच्या पश्चिमी भागात आपल्या देशाबाबत जबरदस्त अभिमान आहे. तर युक्रेनमध्ये रशियन बोलणारे लोक अल्पसंख्याक गटात मोडतात. मात्र त्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

2014 मध्ये रशियाला झुकतं माप देणारे युक्रेनचे राष्ट्रपती व्हिक्टर यानुकोविच यांच्या विरोधात युक्रेन सरकारमध्ये बंडाळी माजली होती. रशियाने नेमकी हीच संधी साधली. त्यानंतर रशियाने क्रिमियावर कब्जाही केला होता. हा संघर्ष बराच काळ चालला. व्हिक्टर यांना जनआंदोलनांपुढे आणि संघर्षापुढे हार पत्करावी लागली. मात्र तोपर्यंत रशियाने क्रिमियाला तोपर्यंत आपल्या देशात विलिन करून घेतलं होतं. या घटनेनंतर युक्रेन पश्चिमी युरोपसह आपले संबंध चांगले कसे होतील याचे प्रयत्न करत आहे. मात्र रशिया याचा सातत्याने विरोध करतो आहे. त्यामुळेच युक्रेन रशिया आणि पश्चिम युरोपमधील देशांच्या संघर्षात अडकला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button