breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: ‘अधिक खासगी लसीकरण केंद्रे उभारा’- आरोग्य मंत्रालय

मुंबई |

१८ ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण १ मेपासून सुरू होणार असतानाच; अतिरिक्त खासगी लसीकरण केंद्रे उभारावीत आणि त्या ठिकाणी गर्दीचे परिणामकारक नियोजन करावे, असे केंद्र सरकारने शनिवारी राज्य सरकारांना सांगितले. या वयोगटातील लाभार्थ्याचे केवळ ऑनलाइन नोंदणीच्या आधारे लसीकरण करण्यावरही केंद्राने भर दिला. नव्या लसीकरण धोरणाच्या (टप्पा ३) प्रभावी अंमलबजावणीबाबत राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्णालये व नैदानिक उपचाराबाबतच्या विद्यमान पायाभूत सोयी बळकट करण्याच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण व कोविड-१९ विरोधी लढ्यासाठी तंत्रज्ञान व माहिती व्यवस्थापनावरील प्राधिकृत गटाचे अध्यक्ष आर.एस. शर्मा यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठक घेतली.

मेपासून होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण धोरणाच्या संदर्भात, खासगी रुग्णालये, उद्योगसमूहांची रुग्णालये, औद्योगिक संघटना इत्यादींना सहभागी करून अतिरिक्त खासगी कोविड-१९ लसीकरण केंद्रांची नोंदणी करण्याची सूचना राज्यांना करण्यात आली, असे आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. लस खरेदी केलेल्या आणि कोविन पोर्टलवर लशीचा साठा व किमती जाहीर केलेल्या रुग्णालयांच्या संख्येवर देखरेख ठेवावी, तसेच पात्र लोकसंख्येला कोविनवर लसीकरणाचे वेळापत्रक पाहता येण्याची व्यवस्था करावी, अशीही सूचना राज्यांना करण्यात आली आहे.

वाचा- #Covid-19: धाराशिव कारखान्यात प्राणवायू निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button