breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

GOOD NEWS : सर्वांना मोफत लस मिळणार, ठाकरे सरकारचा निर्णय

मुंबई – राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणसंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

केंद्रसरकारने १ मे रोजीपासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगी यांना ६०० रुपये राहणार आहे. कोव्हॅक्सीनची किंमत सुध्दा ६०० रुपये राज्यांना आणि १२०० रुपये खासगी यांना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हटलं आहे.

गेल्या कॅबिनेट बैठकीत या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केले आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button