breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळे यांच्या भावना काय?

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरेंच नाव जाहीर करत मोठी खेळी केली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून याआधी १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामध्ये पुण्यातून वसंत मोरे यांना संधी देण्यात आली. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वंचितने बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद केले आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काल वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. वंचितच्या आजच्या यादीत पुण्यातून वसंत मोरे, नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांचे नाव जाहीर करण्यात आले. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा – ‘यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार’; आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार

त्यांच्या या भूमिकेमुळे आता बारामतीमधील लढत आणखीनच चुरशीची होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांचीच वहिनी, सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे बारामतीकर कोणाच्या पारड्यात मत टाकतात, कोणाला निवडून देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानले. त्यांचं हे ट्विट सध्या बरंच व्हायरल झालं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button