breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बलात्कारीत आरोपीसोबत ओली पार्टी, पोलिसांना केले तडकाफडकी निलंबित

बीड – एका मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावलेल्या आरोपीसोबत ओली पार्टी केल्याने दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन एका स्थानिक वृत्तपत्राने केलं होतं. त्यानुसार, या दोन्ही पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. सहायक फौजदार नामदेव धनवडे व हवालदार सत्यवान गर्जे असे या दोघांची नावे आहेत.

एका मूकबधिर मुलीसोबत अत्याचार करणाऱ्या तुकाराम कुडूक या आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. तुकाराम कुडुकला न्यायालयामध्ये हजर करणारे दोन पोलिसच त्याच्या सोबत एस पी ऑफीस जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये चक्क दारू पीत बसले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक आर. राजा व अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. पोलीस अधीक्षकांनी गृह विभागाचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक उमेश कस्तुरे यांना चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

या संदर्भातप्राथमिक अहवाल प्राप्त होताच गुरुवारी रात्री पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस अमलदारांच्या निलंबनाचे आदेश दिले. विशेष म्हणजे निलंबित केलेले दोन्ही पोलीस अंमलदार पोलीस मुख्यालयात नेमणुकीला होते. न्यायालयात आरोपी बंदोबस्त आणि पैरवी अधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी होती. मात्र, बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या आरोपीसोबत खाकी वर्दीवर राजरोस मद्यपार्टी करणे त्यांना भोवले आहे. या प्रकरणाची चर्चा बीड जिल्ह्यात चांगलीच रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button