breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नुस्ता धिंगाणा : अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांचे एकमेकांना गुद्दे!

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी
अधिवेशनात महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर आजपर्यंतच्या  विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करायचे. सरकारविरोधातील रोष आणि आपल्या मागण्या घोषणाबाजीच्या रुपाने मांडून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणायचे. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं. आज सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच विरोधकांना घेरण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांनी ठाकरे-पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळ परिसर दणाणून सोडला. सत्ताधाऱ्यांच्या घोषणाबाजीने विरोधी पक्षाचे आमदार चिडले. त्यांनीही थेट सत्ताधाऱ्यांना भिडत त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. आमदार अमोल मिटकरी, रोहित पवार, चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे आमदार सत्ताधाऱ्यांना भिडण्यात अग्रभागी होते. यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार महेश शिंदे आणि मिटकरी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. व्हिडीओत मिटकरी (Amol Mitkari)-महेश शिंदे (Mahesh Shinde) एकमेकांना गुद्दे घालत असल्याचं दिसून येत आहे. इतरही आमदारही एकमेकांना भिडल्याने विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गोंधळ माजला होता.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आणि शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. याचदरम्यान सत्ताधारी-विरोधी पक्षाचे आमदार एकमेकांना भिडले.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी पन्नास खोके एकदम ओक्के, ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या बाजूला “लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के” अशी घोषणाबाजी शिंदे गट आणि भाजपचे आमदार करत होते. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले. रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती. यावेळी रोहित पवारही प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.

या सगळ्या प्रकारानंतर अमोल मिटकरी यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली. महेश शिंदे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की केली, त्यांच्याविरोधात अॅक्शन घ्यावी, त्यांना लगोलग समज देण्यात यावी, अशी मागणी मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button