ताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय UPI Payment करता येणार

आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज भासणार नाही. कारण आरबीआयने (RBI) मंगळवारी यूपीआय आधारित पेमेंट उत्पादन लाँच केले असून याच्या मदतीने फीचर फोन वापरकर्ते सहज डिजिटल पेमेंट करू शकतील. देशात कोट्यवधी लोक फीचर फोन वापरतात. असे लोक आता यूपीआय पेमेंटदेखील करू शकतील.

यूपीआय ही देशातील लोकप्रिय पेमेंट प्रणाली म्हणून उदयास आली आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये फीचर फोनसाठी डिजिटल पेमेंट सिस्टम सुरू करण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, देशातील आर्थिक सुविधांचा आवाका वाढवण्यासाठी फीचर फोन वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंटच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यानुसार, आरबीआयने मंगळवारी एका ट्विटमध्ये सांगितले होते की, आरबीआय गव्हर्नर ८ मार्च २०२२ रोजी दुपारी १२ वाजता फीचर फोनसाठी UPI123Pay सुविधा आणि डिजिटल पेमेंटसाठी 24*7 हेल्पलाइन-डिजिसाथी लाँच करत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button