ताज्या घडामोडीराष्ट्रिय

अनेक Credit card असतील, तर त्याचे फायदे, तोटे जाणून घेऊया

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड योग्यरित्या मॅनेज केले नाही, तर 2 क्रेडिट कार्ड असणेदेखील तुम्हाला खूप महागात पडू शकते. पण याउलट जर तुम्ही त्यांचा योग्य वापर करत असाल तर अनेक कार्ड असणे तुमच्यासाठी फायदेशीरही ठरू शकते. ते कसे हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा फायदा असा आहे की, जर काही कारणास्तव तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकत नसाल, तर तुम्ही दुसऱ्या क्रेडिट कार्डने पैसे भरू शकता. तसेच अधिक कार्ड तुम्हाला अधिक लिमिट देतात. ऑनलाईन खरेदीवेळी क्रेडिट कार्डधारकांना विविध प्रकारचे फायदे दिले जातात. अशा परिस्थितीत काही बँका ऑफर देतात आणि काही बँकांचे कार्ड तुम्हाला या ऑफर देत नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तुमच्याकडे अधिक पर्याय उपलब्ध असतात.

लक्षात घ्या, जास्त क्रेडिट कार्ड असण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमचा खर्च प्रचंड वाढू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही आणखी कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. तसेच त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button