Uncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘‘जल्लोष शिक्षणाचा’’

  • प्रशासनाचा लक्षवेधी उपक्रम : शिक्षण सुविधा सक्षमीकरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक तसेच नाविण्यपूर्ण विचार वाढीकरीता विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्याद्वारे शिक्षण विभाग व सिटी ट्रान्सफर्मेशन ऑफीस (CTO) याच्या संयुक्त आयोजनाने जल्लोष… शिक्षणाचा २०२३ ह्या स्पर्धात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केली.

‘‘जल्लोष… शिक्षणाचा-२०२३’’ या स्पर्धात्मक उपक्रमाची माहिती देण्यासाठी गुरूवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी किरणकुमार यादव, आरोग्य विभागाचे प्रमुख अजय चारठाणकर, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, तीन विविध विषयांवर उदा.शाळा स्पर्धा, विद्यार्थी स्पर्धा व तीन दिवशीय आनंदोत्सन (कार्निवल) आयोजित केला जाणार आहे. त्याअंतर्गत शाळा स्पर्धा, विद्यार्थी स्पर्धा (मनपा व खाजगी शाळांकरीता), आनंदोत्सव (कार्निवल), मंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स व गेम झोन इत्यादीचे आयोजन केले जाईल.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत ११० प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा कार्यरत असून त्यामध्ये जवळजवळ ५७,००० पैक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शालेय विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करीत आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाने आकांक्षा फौंडेशन आणि लिडरशिप फॉर स्किल एजुकेशन फौन्डेशन यांच्यासोबत करारनामा केलेला आहे. हया करारनाम्यानुसार इंग्रजी भाषा, फौंडेशनल लर्निंग आणि न्यूमरसी, मुख्याध्यापक व शिक्षक अध्यापन करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत मानधनावर शिक्षक भरती व शाळेवर लिपिक कम डेटा एन्ट्री ऑपरेटर नेमणूक करण्याची प्रक्रिया चालू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये “ई-क्लासरूम” हा प्रकल्प राबविणेत येत असून यामध्ये अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थांना नाविन्यपूर्ण माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. सदर प्रकल्पामध्ये विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, रोबोटिक्स अशा पद्धतीची आधुनिक प्रयोगशाळा विकसित केलेली आहे. तसेच डिजिटल अभ्यासक्रमाचा समावेश करून विद्यार्थांना ॲनिमेशनच्या माध्यमातून शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास होणे हे उदिष्ट आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

“क्षमता विकास प्रशिक्षण” शिबीराचे आयोजन…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या शाळेतील मुख्याधापक आणि शिक्षकांसाठी “क्षमता विकास प्रशिक्षण” शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात विज्ञान, गणित, इंग्रजी, समाज शिक्षण, पर्यावरण हया विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचा उपयोग मनपा शाळेतील विद्यार्थांच्या गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त होणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थांना शाळेची आवड निर्माण करण्याकरिता सर्व शाळांतील इमारतींना त्याचबरोबर वर्गखोल्या, कार्यालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय, मुला- मुलींचे शौचालय तसेच फर्निचर यामध्ये एकसूत्रता येणेकरिता एकाच प्रकारचे, एकाच आकारमानाचे व एकाच रंगसंगतीचे रंग देऊन मनपाच्या शाळा देशात अग्रेसर होण्याच्या दृष्टीने शाळांना स्वतंत्र बोधचिन्ह (लोगो), घोषवाक्य, नाव व एकसारखे दिशादर्शक चिन्ह देऊन शाळांना आकर्षित करीत आहोत, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button