breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप उपमहापाैरांनी पाणी पूरवठा अधिकारी रामदास तांबेचा भरसभेत केला निषेध

पाणी पुरवठा बैठकीत उपमहापाैर तुषार हिंगेनी विचारलेल्या प्रश्नांवर तांबेची उडाली भंबेरी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येत आहेत. त्यामुळे शहरभरातून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून त्या तक्रारींचे तातडीने उपाययोजना करण्यासह नागरिकांना स्वच्छ व योग्य दाबाने पुरवठा व्हावा, याकरिता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आज (मंगळवार) बैठकीचे आयोजन केले होते.

याप्रसंगी उपमहापाैर तुषार हिंगे यांनी पाणीपुरवठा सह शहर अभियंता रामदास तांबे यांना धारेवर धरत विचारलेल्या प्रश्नांवर तांबेची चांगलीच तारांबळ उडाली. तांबे यांना एकाही प्रश्नांचे व्यवस्थित उत्तर देता आले नाही. तसेच सर्व प्रश्नांची माहिती घेवून सांगतो, असं प्रशासकीय भाषेत उत्तर दिल्याने उपमहापाैरांनी पाणी पुरवठा अधिका-यांचा भरसभेत जाहीर निषेध नोंदवून सभात्याग केला.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके,मनसे.गटनेते सचिन चिखले,अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे,नगरसदस्य अभिषेक बारणे,तुषार कामठे,अतिरीक्त आयुक्त अजित पवार,पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रामदास तांबे व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराला पाणीपूरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. असे असताना शहराला अद्यापही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील अनेक भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने अनेकांना जुलाब, उलट्या, पोटदुखीचे आजार होत आहेत. काही भागांत कमी दाबाने आणि अवेळी पाणीपुरवठा होत आहे. पुरेसा प्रमाणात पाणी न मिळाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.

कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांना पुरेसे पाणी न मिळणे ही गंभीर बाब आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना सुरळीतपणे स्वच्छ व योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. दरम्यान, पाणीपुरवठा विषयक प्नश्नांबाबत उपमहापाैत तुषार हिंगे यांनी विचारलेल्या प्रश्नावर संबंधित अधिका-यांनी ब्र शब्द काढला नाही. केवळ माहिती घेवून सांगतो. अशी प्रशासकीय भाषेत उत्तरे दिली. त्यामुळे संबंधित अधिका-यांचा भरसभेत निषेध नोंदवून उपमहापाैरांनी सभात्याग केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी उपमहापौर तुषार हिंगे साहेब यांच्यासह अन्य पदाधिका-यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत माहिती घेऊन ती पुढील बैठकीत सादर करण्यात येईल. असं आश्वासन यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button