TOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘यु-डायस प्लस’मध्ये शाळांची माहिती भरण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंतची मुदत

पुणे : केंद्र सरकारकडून  सर्व मान्यताप्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्यासाठी १० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. यु-डायस प्लस प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच केंद्राकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांकांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती गोळा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळेची सांख्यिकी माहिती, शाळा सुरक्षा, अनुदान आणि खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, संगणक आणि नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शाळांतील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, आरटीई प्रवेश, साहाय्यभूत सुविधा आदी माहिती यु-डायस प्लस प्रणालीद्वारे शाळास्तरावर अद्ययावत करण्यात येणार आहे.

यु-डायस प्लस प्रणालीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील  संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी, मोबाईल शिक्षक आदी अधिकाऱ्यांना, शाळा मुख्याध्यापकांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सर्व संबंधितांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button