TOP Newsताज्या घडामोडीपुणे

‘सिलेक्ट वर्ल्ड काँग्रेस’ परिषदेत ‘एफटीआयआय’चे आठ सामंजस्य करार

पुणे : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सिनेमा, ऑडिओव्हिज्युअल अँड मीडिया (सिलेक्ट) या संस्थेची सदस्य असलेल्या राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने (एफटीआयआय) आठ दृकश्राव्य प्रशिक्षण संस्थांसह सामंजस्य करार केला. स्पेनममधीन सॅन सॅबेस्टियन येथे सिलेक्ट वर्ल्ड काँग्रेस ही परिषद झाली.

एफटीआयआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूल्स (सिलेक्ट) या संस्थेची १९५४ मध्ये फ्रान्समध्ये स्थापना झाली. सिलेक्ट या संस्थेत जगभरातील ६५ देशांतील १८० हून अधिक दृकश्राव्य शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या संस्थेच्या माध्यमातून दररवर्षी ९ हजारहून अधिक विद्यार्थी आणि ५५ हजारहून अधिक प्राध्यापकांना प्रशिक्षित करण्यात येते. सिलेक्ट वर्ल्ड काँग्रेस या परिषदेसाठी या वर्षी दृकश्राव्य माध्यमाचे अध्यापन, आव्हाने आणि संधी ही संकल्पना होती. एफटीआयआयचे संचालक प्रा. संदीप शहारे आणि ध्वनी विभागाचे प्रमुख हरीश के. एम. या परिषदेत सहभागी झाले होते.

या परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियातील ग्रिफिथ युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलियन फिल्म टेलिव्हिजन अँड रेडिओ स्कूल, जर्मनीतील इंटरनॅशनल फिल्मस्कूल कॉन, फ्रान्समधील इकोल नॅशनल सुपिरिअर देस मेटिअर्स दे इमेज अ‍ॅड दू सन, सर्बियातील फॅकल्टी ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स, बल्गेरियातील नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट्स, स्पेनमधील एस्क्युला दे सिने वाय व्हिडिओ, बेल्जियममधील इन्स्टिटय़ूट नॅशनल सुपिरिअर देस आर्ट्स दू स्पेक्टेकल अ‍ॅट देस टेक्निक्स दे डिफ्यूजन या संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आला. विविध चित्रपट प्रशिक्षण संस्थांसह सामंजस्य करार केल्याने एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना जगभरातील चित्रपट निर्मितीचे सखोल ज्ञान, विविध शैली, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button