breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘नॉट रिचेबल’ आमदार कुठे आहेत हे असं सांगायचं नसतं : नारायण राणे

पुणे: विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यमंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री आणि शिवसेनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde)काल (सोमवार) परिषदेसाठी मतदान झाल्यानंतर ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. शिंदेंसोबत १३ ते १५ आमदार असल्याचे समजते. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे. योगदिनानिमित्त पुण्यातील एका कार्यक्रमात नारायण राणेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याबाबत प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना नारायण राणेंनी हसून, एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल आहेत. ते कुठं आहेत हे असं सांगायचं नसतं, असं उत्तर दिलं आहे.

दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेसवरही टीका केली. देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचं राहिलंय काय? काँग्रेस संकुचित होत चाललीय. केवळ बोलतात, त्यांचं अस्तित्व राहील नाही. देशात त्यांचे नेते, कार्यकर्ते काम करत नाहीत. त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश राहिला नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला, असं राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच, एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचीही चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये : 

गुजरातमधील सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमदारांसह मुक्कामी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच, शिंदे यांचा मुक्काम असलेल्या मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button