Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

करोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईतून आली दिलासादायक बातमी

मुंबईः मागील आठवड्यात करोना रुग्णांमध्ये दोन हजारहून अधिक रुग्णांची भर पडली असतानाच, सोमवारी मात्र या रुग्णसंख्येने थोडा दिलासा दिला आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरीही मृत्यूची संख्या कमी असल्याने मुंबईकरांनी धास्तावून जाण्याचे कारण नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

करोना संसर्गामुळे दिवसभरात बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १,३१० इतकी असून, त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्के आहे. रविवारी रुग्णसंख्या २,०८७ इतकी होती. सोमवारी ९७ रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल कऱण्यात आले असून, १२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या ऑक्सिजनबेडवरील रुग्णांचे प्रमाण २.६८ टक्के आहे. करोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या १,११६ असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. तर करोनामुळे मुंबईमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील एका महिला रुग्णाचे वय ४० होते. या महिला रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाबाचा दीर्घकालीन त्रास होता. तर ९४ वर्षीय महिला रुग्णालाही उच्चरक्तदाब आणि हृदयरोग होता.

– बरे झालेले रुग्ण – ९७ टक्के

– १३ ते १९ जूनपर्यंत मुंबईतील कोविडवाढीचा दर – ०.१८१ टक्के

– मुंबईतील रुग्णदुपटीचा दर – ३७४ दिवस

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button