breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तुम्हाला जे जमलं ते कोणत्याच राज्याला जमलं नाही, पंकजांकडून शिवराज सिंहांचं कौतुक

बीड: भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ८ वा पुण्यस्मरण दिन आहे. त्यानिमित्ताने आज गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. यावेळी त्यांचं स्वागत करताना स्तुतीसुमनं उधळली. ज्यांच्या नावातच शिवराज आहे, ज्यांच्यावर शिवचा आशीर्वाद आणि जनतेच्या मनावर राज्य या दोघांचाही सहभाग आहे, त्याचं मी गोपीनाथ गडावर स्वागत करते, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी शिवराज सिंहांचं स्वागत केलं. तसेच, त्यांनी ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी जे केलं त्याबाबतही पंकजा मुंडेंनी त्यांचं कौतुक केलं.

“ज्यांच्या नावातच शिव-राज आहे, ज्यांच्यावर शिवचा आशीर्वाद आणि जनतेच्या मनावर राज्य या दोघांचाही सहभाग आहे, त्याचं मी गोपीनाथ गडावर स्वागत करते. आपलं जे नातं आहे ते माझ्यामुळे नाही तर गोपीनाथ मुंडेंमुळे आहे. इथेच तुम्ही मुंडेंच्या अंत्यसंस्काराला आला होतात, जिथे तुम्ही त्यांचे अंतिम दर्शन घेतले. आज तिथेच कमळाच्या फुलावर त्यांचा समाधी आहे, या समाधीचं नाव गोपीनाथ गड आहे”.”तुम्ही मध्यप्रदेशात जी कमाल केली जी देशात कुठल्याही राज्यात झाली नाही, तुम्ही ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचं काम केलं, त्यासाठी आम्ही तुम्हाला सन्मानित करतो. आम्ही तुमचे स्वागत प्रेम आणि प्रार्थनेने केलं, त्याचा स्विकार करा. तुमच्यासारखे लोक जेव्हा या गडावर येतात तेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते”, असं म्हणत पंकजा मुंडे म्हणाल्या.

“आज मला त्या दिवसाची आठवण येते, आज मुंडे साहेबांचं ८ वं पुण्यस्मरण आहे. मोदींच्या सरकारलाही ८ वर्ष पूर्ण झाले. मोदींच्या सरकारमध्ये मुंडेंचा चेहरा पाहणारे लोक मुंडेंचा सत्कारही करू शकले नाही. इथेच त्यांच्या सत्काराची सभा होणार होती. पण, आम्हाला अंत्यसंस्कार करावे लागले. मुंडेंची जागा कोण घेणार, त्या लोकांना एकत्र करण्यासाठी गोपीनाथ गड मी तयार केला. हे माझ्यासाठी नाही, तर हे या लोकांसाठी आहे. या लोकांना माझ्याकडून काहीही अपेक्षा नाही, यांना फक्त एका व्यक्तीला पाहायचं आहे, जो मुंडेंविषयी प्रेम मनात ठेवतो आणि गरिब, वंचितांचं काम करतो”, असंही त्या म्हाणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button