breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

Knee Pain : गुडघेदुखीला आराम नाहीये? मग ‘या’ टिप्स फॉलो करा..

Knee Pain Home Remedy : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण अनेक युक्त्या लढवतो. खेळण्याने, धावण्याने किंवा जास्त पायपीट झाल्याने, जिना चढल्याने गुडघेदुखीचा त्रास संभवतो. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागतील, ज्यामुळे तुम्ही गुडघेदुखी आणि पेटके येणे थांबेल.

बूट योग्य मापाचे वापरावेत

योग्य आकाराचे आणि चांगल्या दर्जाचे बूट न घातल्याने गुडघे आणि पाय दुखण्याची तक्रारही होऊ शकते. म्हणून, बूट खरेदी करण्यापूर्वी, आपल्या पायांचा आकार आणि बुटाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला धावताना दुखणे आणि पेटके येणे कमी होईल.

धावण्यापूर्वी वॉर्मअप करणे

धावल्यानंतर तुम्हाला गुडघेदुखी किंवा पायात क्रॅम्प्स येण्याचा त्रास होत असेल, तर हा आधी वॉर्मअप न केल्याचा परिणाम असू शकतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही धावत असाल तेव्हा आधी वॉर्मअप करायला विसरू नका. वॉर्मअप करण्यासाठी, धावण्यापूर्वी धिम्या गतीने चाला किंवा थोडे धावा. यामुळे गुडघेदुखीची समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

हेही वाचा – ‘लोकसभा निवडणुकीत मोदी सत्तेत आल्यास विधानसभा निवडणुकाच होणार नाहीत’; पृथ्वीराज चव्हाण

शरीर हायड्रेटेड ठेवणे

गुडघेदुखीची अस्वस्थता धावल्यानंतर कमी करण्यासाठी तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. तसं पाहिलं तर अनेक वेळा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, स्नायूंमध्ये क्रॅम्प्स आणि पेटके येणे सारख्या समस्यांची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसभरात थोड्या-थोड्या वेळाने पुरेसे पाणी पीत रहावे.

आईस पॅकने शेकणे/ तेलाने मसाज

जर तुम्हाला धावल्यानंतर वेदना किंवा क्रॅम्प येतोय, असं वाटत असेल, तर बर्फाने शेक घेणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. लक्षात ठेवा गुडघ्याला बर्फाने फक्त 15 मिनिटे शेक द्या. यापेक्षा जास्त वेळ गुडघे शेकू नका. याशिवाय तुम्ही तेलानेही मसाज करू शकता. यामुळे दुखण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button