breaking-newsक्रिडामनोरंजन

‘बाहुबली’ची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात; लवकरच करणार लग्न?

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली आहे. या चित्रपटासोबतच अनुष्का खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. ‘बाहुबली’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि अनुष्का डेट करत असल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मात्र या दोघांनीही या चर्चा अफवा असल्याचं म्हणत रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाकारलं. आता अनुष्काच्या लग्नाविषयीची जोरदार चर्चा असून ती एका क्रिकेटरशी लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जाते आहे.

हा क्रिकेटर दक्षिणेचा नसून उत्तर भारतातला असल्याचं कळतंय. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे लग्नाचीही तयारी जोरदार सुरु असल्याचं समजतंय. मात्र अद्याप अनुष्काने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. हा क्रिकेटर नेमका कोण असेल याबाबत बरेच तर्कवितर्क चाहत्यांद्वारे लावले जात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button