breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“नवीन वर्ष, नवीन घोटाळे” सोमय्याच्या यादीत ‘या’ नेत्यांची नावे

2023 नववर्षाचा किरीत सोमय्यांचा नवीन संकल्प
मुंबई : आपण सर्वच नवीन वर्षाच्या सुरूवातीला नवनवे संकल्प करतो. काही जण वाईट गोष्टी सोडण्याचा करतात. मात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नव वर्षात अजुन काही राजकारणांच्या वाईट गोष्टी बाहेर काढणार असल्याचा संकल्प केला आहे. नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले आहेत. यात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावे आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी 5 नेत्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महत्वाचे नाव म्हणाजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबाचे आहे. यासोबतच ठाकरे गटाचे नेते अनिल परब याचं साई रिसॉर्ट प्रकरण देखील त्यांच्या निशाण्यावर आहे. सोबत राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्याही नावाचा समावेश आहे.

येणाऱ्या 2023 या नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले, अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुबई महापालिकेतील घोटाळे, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षात किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button