breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘बांधवगड व्याघ्र प्रकल्पातील आग मानवी हस्तक्षेपामुळेच’

भोपाळ |

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र अभयारण्यात मोहाची फुले गोळा करताना त्याची पाने जाळल्याने आग लागली असावी, असे वन मंत्री विजय शहा यांनी म्हटले आहे. या आगीने बांधवगडच्या जंगलात मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने ही आग विझवण्यासाठी केंद्राकडे विमानावर आधारित अग्निशमन यंत्रणेची मदत मागितली आहे. बांधवगड व्याघ्र अभयारण्यात वणव्याची घटना काही दिवसांपूर्वी लक्षात आली असून बुधवारी उमरिया जिल्ह्य़ातील अभयारण्यात लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतातील जैववैविध्यपूर्ण अशा जीवावरणाचा या वणव्याने नाश झाला असे सांगण्यात येत आहे. बांधवगड अभयारण्याला भेट दिल्यानंतर मंत्री शहा यांनी सांगितले, की सुदैवाने या आगीत मनुष्यहानी झाली नाही व कुठलेही जंगली प्राणी मरण पावले नाहीत. प्रत्येकाने ही आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

ही आग लागण्याची तीन कारणे असू शकतात; एक तर लोकांनी मोहाची फुले गोळा केल्यानंतर उरलेला कचरा जाळण्याचा प्रयत्न केला असावा. दुसरे म्हणजे या अभयारण्यात राहणाऱ्या लोकांनी जंगली हत्तींना पळवण्यासाठी आग लावली असावी कारण हे हत्ती छत्तीसगड भागातून येत असतात. तिसरे कारण म्हणजे कुणीतरी जळती सिगरेट टाकल्याने ही आग लागली असण्याची शक्यता आहे, असे वनमंत्री शहा यांनी सांगितले. ते म्हणाले, अशी आग विझवण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेची गरज आहे. याबाबत सहा व सात एप्रिलला बैठक होत आहे. विकसित देशात अशा आगी विझवण्यासाठी अग्निशमन विमानांचा वापर केला जातो.  आम्ही केंद्र सरकारला विनंती करून २३५ कोटी रुपये किमतीचे विमान खरेदी करण्याची विनंती करणार आहोत. अशा विमानांत मोठा पाणीसाठा असतो. अशा आगीच्या घटनांत विमान बांधवगड व कान्हा अभयारण्यात दिल्लीहून दोन तासात प्रवेश करू शकते. बांधवगड व्याघ्र अभयारण्याचे क्षेत्रफळ १ ५३६.९३ चौरस कि.मी असून तेथे १०४ वाघ आहेत. वाघांचा अधिवास येथे मोठय़ा प्रमाणात असल्याचे या अभयारण्याचे क्षेत्र संचालक विन्सेंट रहीम यांनी सांगितले.

वाचा- #Covid-19: महाराष्ट्र, पंजाबमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या अधिक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button