Uncategorized

मागील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतंः मलाही तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता, देवेंद्र फडणवीसांनी केले स्पष्ट

नागपूर : मागील महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने वागत होतं. आमच्या अनेक आमदारांना त्यांनी त्रास दिला. मला देखील तुरुंगात टाकण्यासाठी प्लॅन आखला असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला. मात्र, आम्ही तसे वागणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशीही आरोपप्रत्यारोप पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत आपल्या भाषणात ठाकरे गटाने केलेल्या आरोपांवर उत्तरे दिली. तर अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत गृहविभागाविषयी माहिती दिली. यावेळी विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांनाही त्यांनी खोडून काढलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
या सरकारच्या पाच महिन्याच्या कालावधीत 6 हजार 195 कोटी नैसर्गिक आपत्तीसाठी दिले. 2400 कोटी प्रोत्साहन भत्ता दिला. 9 हजार 559 कोटी रुपये देण्याचे विक्रमी काम सरकारने केले आहे. 33 महिने आघाडी सरकार होते, तेव्हा प्रतिमहा 293 कोटी आणि शिंदे सरकारने 1239 कोटी रुपये प्रतिमहा दिले. राज्याच्या इतिहासात शिंदे सरकारने निर्णय घेतला. सततच्या पावसाचे 3 हजार कोटी आपण देत आहोत. केंद्र सरकारने देखील इनडिआरएफच्या नोममध्ये बदल केला. येत्या काळात शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळणार आहे. सरासरी वर्षाला 512 कोटी पीक विमा मिळाला आणि आता 3 हजार 496 कोटी मिळाला. कोणत्या सरकारच्या काळात विमा कंपन्या श्रीमंत झाल्या?

राज्य सरकारने रेट ऑफ कनविक्शन वाढवण्याचा निर्णय घेत आहोत. आता गुन्हाची व्याख्या बदलली आहे. 2013 पासून गुन्हे ट्रेस होत आहेत. बलात्काराच्या प्रकरणात 60 दिवसात चार्जशीत दाखल व्हायला हवी. लहान मुलांचे लैगिंक अत्याचार याबाबत 98 टक्के गुन्हे उघडकीस आपण आणत आहोत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button