breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी

चीनमध्ये मिळाला ‘Bird Flu’च्या नवीन स्ट्रेनचा रुग्ण; जाणून घ्या किती आहे धोकादायक

नवी दिल्ली | 

चीनमध्ये H10N3 हा बर्ड फ्लूचा विषाणू माणसात आढळून आला आहे, मानवात हा विषाणू आढळून येण्याची जगातील ही पहिलीच वेळ आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही घोषणा केली आहे. झेनजियांग शहरात ४१ वर्षांची एक व्यक्ती बर्ड फ्लूच्या H10N3 या विषाणूने बाधित झाली असून सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. हा संसर्ग फारसा गंभीर नसल्याचे सीजीटीएन टीव्हीने म्हटले आहे. चीनचे आजारांशी असलेले संबंध संपण्याचे नाव घेत नाही. हा आजार गंभीर नसल्याचे सीजीटीएन टीव्हीने सांगितले असले तरी खबरदारी घणे महत्वाचे आहे. कारण संपूर्ण जग चीनमधूनच पसरलेल्या कोविड -१९ साथीच्या आजाराशी झुंज देत आहे.

महिन्याभरापूर्वी चीनच्या झिनजियांग शहरात एक ४१ वर्षीय नागरीक आजारी पडला आणि रुग्णालयात पोहोचला. त्यानंतर उपचारादरम्यान तो बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेन ने ग्रस्त असल्याचे निदर्शणास आले. त्या रूग्णात तीव्र ताप आणि सर्दीची लक्षणे दिसली जी करोना सारखीच आहेत. या व्यक्तीस बर्ड फ्लू कसा झाला हे समजलेले नाही. एच १० एन ३ या विषाणूचे एकही प्रकरण याआधी सापडले नव्हते. रॉयटर्समध्ये याबाबत एका अहवालात माहिती दिली आहे.

रोग पसरण्याचा धोका कमी, मात्र…

H10N3 हा एक नवीन स्ट्रेन आहे, जो गंभीर नसला तरी खबरदारी घेणे आवश्यक आहे. आतापर्यंत हा स्ट्रेन बघितल्या गेला नाही, जगातील हे पहीलेच प्रकरण आहे. कोरोनाबद्दल आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या चीनने या फ्लूच्या पुष्टीकरणानंतर स्वताला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. तेथील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की हा रोग पसरण्याचा धोका कमी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button