breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे विमानतळावर पाण्याची बाटली 60 रुपयांना कशी? पी.चिदंबरम याचं ट्विट

व्हेंडिंग मशीन बसवण्याचा सल्ला, तर प्रशासनाकडून तत्काळ दखल, सोयी-सुविधाबाबत दिली माहिती

पुणे |महाईन्यूज|

पुणे विमानतळावर पिण्याच्या पाण्याची बाटली 60 रुपयांना कशी विकली जाते, व्हेंडिंग मशीन बसविले, तर तिची किंमत 25 रुपयांपर्यंत खाली आणता येईल,’ असे ट्‌विट करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना या विषयावरून नेटिझन्सनी शनिवारी (दि 8) ट्रोल केले.

चिदंबरम एका कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी चार तासांसाठी पुण्यात आले होते. परतत असताना त्यांनी पिण्याच्या पाण्याची बाटली पुण्यातील लोहगाव विमानतळावर 60 रुपयांना मिळते, असे ट्‌विट केले. तसेच त्यासाठी व्हेंडिंग मशीन बसविण्याचाही सल्ला दिला.

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना त्यांनी टॅग केले होते. त्यावर पुणे विमानतळाच्या हॅंडलवरून लगेचच रिप्लाय देण्यात आला. त्यात, ‘गृहमंत्र्यांची सूचना स्वागतहार्य आहे. व्हेंडिग मशीन लवकरच बसविण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे,’ असे सांगण्यात आले.

त्यानंतर प्रशासनाने पुन्हा एकदा ट्‌विट केले. त्यात ‘पुणे विमानतळावर पिण्याचे पाणी ग्लाससह मोफत उपलब्ध आहे. तसेच पहिल्या मजल्यावर पिण्याच्या पाण्याची बाटली दहा रुपयांना, चहा 20 रुपयांना आणि कॉफी 25 रुपयांना उपलब्ध आहे,’ असे निदर्शनास आणून देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button