TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत लवकरच नवीन कारागृह ; जागा शोधण्याचा उपमुख्यमंत्री फडवणीस यांचे आदेश

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कैद्यांच्या संख्येमुळे मुंबई शहरात नवीन कारागृह उभारण्याचा सरकार विचार करत आहे. यासाठी जागा शोधण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांना मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

पोलिसांची घरे, पोलिस वसाहती तसेच पोलिस विभागाच्या मालकिच्या जागांवरील बांधकाम या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या समवेत वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची बैठक झाली.या बैठकीत फडवणीस यांनी मुंबईत शहरात नवीन कारागृहाच्या उभारणीसाठी जागा शोधण्याचे आदेश पोलिस महासंचालक रजनीश सेठ  व मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले आहेत.

मुंबईत ऑर्थर रोड आणि भायखळा कारागृह ही दोन कारागृहे आहेत. या कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. भायखळा येथील कारागृहाची ८०० कैद्यांची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी ३ हजार ५०० च्या आसपास कैदी आहेत. हीच अवस्था ऑर्थर रोड कारागृहाची आहे.  या ठिकाणी ८०० कैद्यांची क्षमता असताना येथे देखील ३ हजार पेक्षा जास्त कैदी आहेत. याचा विचार करून मुंबई शहरात नवीन कारागृह बांधण्याचा सरकारचा विचार आहे.यासाठी जागा शोधली जाणार आहे.

या आढावा बैठकीत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महांडळाच्या प्रमुख अर्चना त्यागी उपस्थित होत्या. यावेळी पोलिस प्रशिक्षण केंद्र इमारतींची दुरस्ती, पोलिस वसाहत दुरस्ती, जिल्हा पोलिस बल इमारत दुरस्ती, पोलिस निवासी बांधकामे, पोलिस मुख्यालय इमारत बांधकामे  याबाबत चर्चा झाली.५४१ कोटी रुपये  निधी या बांधकामांसाठी वितरित केल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button