breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

Neeraj Chopra : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र!

Neeraj Chopra : ‘गोल्डन बॉय’ निरज चोप्रा ने डबल धमाका केला आहे. त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच फेरीत ८८.७७ मीटर भालाफेक करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. इतकंच नाही, नीरजने आगामी ऑलिम्पिकचंही तिकीट कन्फर्म केलं आहे.

पुढील ऑलिम्पिक स्पर्धा २०२४ मध्ये पॅरिस इथे होणार आहे. नीरजने फेकलेला पहिलाच भाला हा ८८.७७ मीटर इतका लांब गेला. आता नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडलपासून एक पाऊल दूर आहे.

हेही वाचा – ‘निम्मे पिंपरी-चिंचवडकर झोपले असताना मी पुन्हा आलो..’; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

नीरज चोप्रा याला गेल्या वर्षी गोल्ड मेडल जिंकण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे नीरजला सिलव्हर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आता नीरजकडे सुवर्ण कामगिरी करण्याची संधी आहे. येत्या रविवारी २७ ऑगस्ट रोजी सुवर्ण पदकासाठी सामना होणार आहे. नीरज पात्रता फेरीत ए ग्रुपमध्ये होता. जिथे इतर खेळाडूंना ८० मीटर पर्यंत भालाफेक करणं अवघड होतं तिथे नीरजने आपला झेंडा रोवला. नीरजने थेट ८८.७७ मीटर लांब भाला फेकला. नीरजच्या या मोसमातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button