breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात आज कोरोनाचा एकही बळी नाही, पिंपरी-चिंचवडकरांना काळजी घेण्याचे आवाहन

पिंपरी / महाईन्यूज

कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती वर्तवली जात असताच पिंपरी-चिंचवडमधील कोरोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत आहे. आज दिवसभरात 215 जणांना विषाणुची बाधा झाली. तर, आज कोरोनाने एकही रुग्ण दगावला नसल्याची सुखद बातमी आहे. तथापि, पिंपरी-चिंचवडकरांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज दिवसभरात 215 लोकांना कोरोनाची बाधा झाली. ही संख्या काल 192 होती. त्यामध्ये आज 23 रुग्णांची भर पडली आहे. त्यातील 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेरील वसाहतीत राहणारे आहेत. आज दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांना या बातमीमुळे काहीसा दिलासा मिळालेला आहे.

आजअखेर पिंपरी-चिंचवडमधील 90 हजार 696 रुग्णांना कोरोना झाला. त्यातील 1 हजार 586 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. तर, 87 हजार 275 रुग्णांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आज दिवसभरात शहरातील 1 हजार 444 घरांना भेटी देऊन 4 हजार 827 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button