breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीने पदासाठी १५ वर्षे डावलले; पण, महेश लांडगेंनी सावरले!

  • वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांची भावना
  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला न्याय

पिंपरी । प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सुमारे १५ वर्षे काम केले. मात्र, याकाळात पक्षाने एकाही महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी दिली नाही. २०१९ मध्ये आमदार महेश लांडगे यांच्यासोबत भाजपाचे काम करायला सुरूवात केली.  अखेर आमदार लांडगे यांनी मला महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्यपदी काम करण्याची जबाबदारी दिली. राष्ट्रवादीने मला कायम डावलले, पण आमदार लांडगे यांनी सावरले आहे, अशा भावना वृक्ष प्राधिकरण समितीचे नवनियुक्त सदस्य आनंदा यादव यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. सदस्यपदाची अधिकृत घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यानंतर आनंदा यादव यांनी आपले नियुक्तीपत्र स्विकारले आहे.

आनंदा यादव म्हणाले की, मी केंद्र सरकारच्या सेवेत असल्यामुळे अधिकृतपणे पक्षाचे काम करता आले नाही. पण, २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. आमझभाई पानसरे, योगेश बहल आणि विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या कार्यकाळात उपाध्यक्ष म्हणून संघटनात्मक जबाबदारी पार पाडली. त्यानंतर मला सेवा दलाचा अध्यक्ष म्हणून काम सोपवले. पण, राष्ट्रवादीत सहकार्य करणारी मंडळी नाही. स्वार्थ पाहणाऱ्या लोकांचा भरणा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये माजी आमदार विलास लांडे यांचेही प्रामाणिकपणे काम केले. पण, पक्षाने मला महापालिकेत कोणतीही संधी दिली नाही.

स्वीकृत सदस्यपदी केले राजकारण…

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना वरिष्ठांनी मला स्वीकृत सदस्यपदी संधी दिली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पाठवलेल्या नावांवर स्थानिक नेत्यांनी खाडाखोड केली आणि मला पदापासून वंचित ठेवले. त्यावेळी सभागृह नेत्या मंगला कदम होत्या. माजी आमदार विलास लांडे यांचे काम केल्यामुळे कदम माझ्यावर नाराज होत्या. त्यामुळेच मला स्वीकृत सदस्यपदी संधी मिळाली नाही, असेही आनंदा यादव यांनी म्हटले आहे.

चिखली गावातील ग्रामस्थांना आनंद…

आमदार महेश लांडगे यांनी मला जबाबदारी सोपवून न्याय दिला. टाळगाव चिखलीत कै. दत्ताकाका साने सोडले तर तीन नगरसेवक भाजपाचे निवडून आले आहेत. संपूर्ण गाव आमदार लांडगे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हीही २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांत आमदार लांडगे यांनी वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. माझ्यासह टाळगाव चिखली आणि वारकरी सांप्रदायातील स्थानिक लोकांना आनंद झाला आहे. मला संधी मिळाली, तशीच प्रामाणिक काम करणाऱ्यांना संधी मिळेल, अशी भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असेही आनंदा यादव यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button