breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? लागले भावी खासदाराचे बॅनर्स

पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. आता या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीमधून पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचं तिकीट काँग्रेस उमेदवाराला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या जागेसाठी राष्ट्रवादी देखील इच्छूक असल्याचं समोर आलं आहे.

पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून पुण्यनगरीचे भावी खासदार प्रशांत जगताप अशा आशयाची बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बॅनरवरून स्पष्ट होत आहे.

भाजपकडून दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button