ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवनीत राणांची ‘पुष्पा’ स्टाईल होळी उत्साहात साजरा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अमरावती | देशभरात होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा होत असतानाच खासदार नवनीत राणा यांनीदेखील आपल्या मतदारसंघातील आदिवासी बांधवांसोबत होळी सण साजरा केला. यावेळी नवनीत यांनी आदिवासींसोबत पारंपरिक नृत्यावरही चांगलाच ठेका धरला व ढोलही वाजवून दाखवला. त्यानंतर मुलांसोबत खेळताना त्या त्यांच्यासोबतही चांगल्याच रमल्या. यावेळी पूर्णपणे रंगाने माखलेल्या मुलांसोबत त्यांनी ‘पुष्पा’चा फेमस डॉयलॉग बोलून दाखवला.

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत असून लोकांचीही त्याला पसंती मिळत आहे. यामध्ये त्या पुष्पा स्टाईलमध्ये आपल्या हनुवटीवरुन हात फिरवत म्हणतात की, ‘नवनीत नाम सुनके फ्लॉवर समझे क्या, फायर ए मै फायर’. होळीनिमित्त राज्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची धुळवड रंगलेली असतानाच नवनीत राणांचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button