ताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का

१० आमदार भाजपच्या वाटेवर

नवी दिल्ली | पाच राज्यांमध्ये दारुण पराभव स्वीकारलेल्या काँग्रेसला आता पुन्हा एकदा मोठा धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. भाजप गुजरातमधील काँग्रेस आमदारांना फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांचे सल्लागार संयम लोढा यांनी नुकतेच ट्विट केले आहे.

माहितीनुसार, गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून काॅंग्रेसला मोठा झटका मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सल्लागाराने असा दावा केला आहे की, भाजप गुजरातमध्ये काॅंग्रेसच्या आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. या गोष्टीची माहिती काॅंग्रेस नेतृत्वाला देण्यात आली असून, काँग्रेसला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच लोढा म्हणाले, ‘मी काँग्रेसला इशारा दिला आहे. मला याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे मी पक्षाला कळवले आहे. मी २० दिवसांपूर्वी रघू शर्मा यांना सांगितले, मात्र त्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मी पक्षाच्या हायकमांडला सावध करण्यासाठी टॅग केले. गुजरातमध्ये २०२० मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या ८आमदारांनी राजीनामा देऊन नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

नुकतेच काँग्रेसचे ५ माजी आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. सध्या राज्यात काँग्रेस आमदारांचे संख्याबळ ६५ आहे. तर नुकत्याच देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. आता सर्वांचे लक्ष गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीकडे लागले आहे. या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार आहे. काँग्रेस हा विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष आहे. दोन्ही राज्यांत भाजपची काँग्रेसशी चुरशीची लढत निश्चित आहे. गुजरात राज्य हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पंतप्रधान मोदींच्या गृहराज्यात काँग्रेस भाजपला कडवे आव्हान देण्याच्या मनस्थितीत आहे. मात्र भाजप निवडणुकीपूर्वी काँग्रेसची तोडफोड करू शकते. अलीकडेच पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये रोड शो करून निवडणुकीच्या तयारीचे संकेतही दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button