breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निसर्गातील त्रिसूत्रीचे संवर्धन सेंद्रिय शेती मधूनच होऊ शकते : विदुरा नवले

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

निसर्गातून पुन्हा निसर्गाकडे हे सेंद्रिय शेतीचे मूलतत्त्व असून पर्यावरण, प्रदूषण व आरोग्य या त्रिसूत्रीचे पालन फक्त सेंद्रिय शेतीतून साधले जाऊ शकते, असे प्रतिपादन माजी खासदार व श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना लि. चे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांनी आज येथे केले.

शहरातील ‘ताथवडे’ येथे उभारण्यात आलेल्या ‘इरिच इंटल इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या सेंद्रिय खते उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, माजी महापौर उषा ढोरे, कृषी तज्ज्ञ विजय ठुबे, माजी उपमहापौर झामाताई बारणे, ‘इरिच ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संस्थापक-अध्यक्ष प्रदीप शेळके, ‘इरिच इंटल इंडिया लि.’ चे चेअरमन शहाजी बारणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘रचनात्मक शेती करण्याकडे अलीकडच्या काळात शेतकरी नवनवीन प्रयोग व संशोधन करीत असून पिकांची वाढ व उत्पादन क्षमतेचा विकास केवळ सेंद्रिय खतांच्या माध्यमातून होतो असे विदुरा नवले यांनी यावेळी पुढे म्हटले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी, ‘बदलत्या काळानुसार निसर्ग व पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी आज सर्वांवर आली आहे. भविष्याचा वेध घेणारा ‘इरिच इंटल इंडिया लि.’ कंपनीचा हा प्रकल्प सामाजिक दायित्व म्हणून या खत निर्मिती प्रकल्पामध्ये उतरला असल्याचे पाहून समाधान वाटते’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. माजी महापौर उषा ढोरे, शामराव राक्षे, विजय ठुबे, यांचीही याप्रसंगी भाषणे झाली.

‘इरिच इंटल इंडिया लि.’चे संचालक लक्ष्मण सावंत यांनी, उपस्थितांना, कंपनीच्या उत्पादनांची माहिती दिली.तर, संचालक संजय धनवे यांनी कंपनीचे ध्येय व उद्दिष्टे याचा परिचय पाहुण्यांना करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे चेअरमन शहाजी बारणे यांनी केले. प्रगतशील शेतकरी मारूती शेळके, दत्तात्रय बारणे पाटील, शिवराम भोंडवे, मुक्ताजी नाणेकर, रामचंद्र मोहिते पाटील, शाम राक्षे, मधुकर भोंडवे आदींचा सन्मान यावेळी करण्यात आला.

संचालक विलास पाटील, ज्ञानेश देवडे, विशाल गावडे यांनीही उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘इरिच इंटल इंडिया लि.’ कंपनीचे संचालक विजय बोत्रे पाटील यांनी केले तर ‘इरिच ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संस्थापक – अध्यक्ष प्रदीप शेळके यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button