‘देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला’; नारायण राणेंचं विधान

मुंबई | केंद्रीय मंत्री नाराणय राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यासाठी चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस मागे लागले होते त्यामुळे मी भाजपात गेलो असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ते सिंधुदुर्गमधल्या सभेत बोलत होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस माझ्या मागेच लागले होते की तुम्ही भाजपात या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीचं की मुलाचं लग्न होतं त्यानंतर मी रस्त्यात चालत असताना फडणवीस मला भेटले मला म्हणाले एक मिनिट जरा बोलायचं होतं. तेव्हा मला त्यांनी रस्त्यातच सांगितलं दादा पक्षात या. मी म्हटलं देवेंद्र तू मला हे रस्त्यावर कसं काय विचारतो. तू मला बोलव आपण चर्चा करू. त्यानंतर आमची चर्चा घेतली. मी भाजपात गेलो. मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असतो. त्यानुसार मी विचार केला आणि त्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – ‘देशात पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय’; भाजप नेत्याचं मोठं विधान
नारायण राणे हे ३९ वर्षे शिवसेनेत होते. मात्र, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं शत्रुत्व सर्वश्रुत आहे. शिवसेनेत या दोघांमध्ये टोकाचे मतभेद झाले होते. त्यामुळेच नारायण राणेंनी शिवसेना सोडली. त्यांनंतर ते काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे मी भाजपात आलो, असं नारायण राणे म्हणाले.





