ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यशवंतनगरातील सर्व्हिस रोडची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

चेंबरलगत दबलेला रस्ता आणि खड्ड्यांची केली डागडुजी; नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी पाठपुरावा

पिंपरी- चिंचवड | प्रभाग क्रमांक ९ मधील यशवंतनगर परिसरातील सर्व्हिस रोडवरील खराब झालेल्या रस्त्याची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. चेंबरच्या बाजूचा रस्ता काही ठिकाणी दबला होता, तर काही ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

यशवंतनगर परिसरातील नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन मा. महापौर व नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर लोंढे यांनी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजवून तसेच दबलेल्या भागाची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्यात आला.

हेही वाचा

दिल्ली विमानतळ, उच्च न्यायालयासह ६ प्रमुख ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी

या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहनचालकांचीही गैरसोय दूर झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था आणखी खराब होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी वेळेत दुरुस्तीची कामे करण्यात यावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रभागातील मूलभूत सुविधांकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे. यशवंतनगरातील सर्व्हिस रोडवरील खड्डे आणि दबलेला रस्ता दुरुस्त करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. प्रभागातील अन्य समस्या देखील प्राधान्याने सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील,” असे डॉ. वैशाली घोडेकर लोंढे यांनी सांगितले.

“नागरिकांची सुरक्षित आणि सुलभ ये-जा ही आमची प्राथमिकता आहे. यशवंतनगरातील सर्व्हिस रोडवरील खड्डे आणि चेंबरलगत दबलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम करून घेतले आहे. प्रभागातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळेपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहील.”

– डॉ. वैशाली घोडेकर, मा. महापौर, नगरसेवक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button