breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘..म्हणून चायवाल्याचा मुलगा पंतप्रधान झाला’; काँग्रेसचा पंतप्रधान मोदांना टोला

मुंबई : देशातील विरोधी पक्षांची बिहारच्या पाठण्यात बैठक आहे. या बैठकीसाठी काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसेच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. तर महाराष्ट्रातून देखील शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाना पटोले म्हणाले की, मी महाराष्ट्रात फिरतोय, काल कल्याण डोंबिवलीत होतो. भाजपाचा गड असलेल्या कल्याण डोंबिवलीत आमचे तीनच सदस्य आहेत. पण तरीही काँग्रेसचं स्वागत करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरली होती. आम्हाला काँग्रेसच पाहिजे, काँग्रेस संपुष्टात येणं म्हणजे लोकशाही संपुष्टात येण्यासारखं आहे, अशी लोकांची भावना आहे.

हेही वाचा – रेशन दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध होणार

महाराष्ट्रात १९९९ मध्ये उत्तर प्रदेशचा पक्ष आला. हैदराबादचाही आला. असे किती आले आणि गेले. आता परत हैदराबादचा पक्ष येतोय. त्याने महाराष्ट्राला काहीच फरक पडणार नाही. महाराष्ट्रातील जनता या अशा प्रलोभनाना बळी पडणार नाही. तेलंगनाचा शेतकरी किती अडचणीत आहे, सामाजिक व्यवस्थेत किती बिघाड आहेत हे माहितेय. शाहु, फुले, आंबेडकरांचा विचार काँग्रेस जोपासत आहे. गेल्या ६० वर्षांत काय केलं तर, शाहु, फुले, आंबेडकरांच्या जोपासलं. म्हणून चाय विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकला, ही काँग्रेसचीच देन आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button