breaking-newsक्रिडा

शिवा थापा, पूजा राणीची अंतिम फेरीत धडक

ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धा : – माजी जागतिक कांस्यपदक विजेत्या शिवा थापाने (६३ किलो) संघर्षपूर्ण विजयासह ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली आहे. याचप्रमाणे पूजा राणी (७५ किलो) आणि आशीष (६९ किलो) यांनीसुद्धा अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. परंतु चार भारतीय खेळाडूंना कांस्यपदकांवर समाधान मानावे लागले आहे.

चार वेळा आशियाई विजेत्या आणि महिन्याच्या पूर्वार्धात तिसरे राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या शिवाने जपानच्या डायसुके नरिमत्सूचा विभाजित निकालांतर्गत पराभव केला. आशीषने जपानच्या हिरोआकी किनज्योला नामोहरम केले. आशियाई क्रीडा स्पध्रेतील माजी कांस्यपदक विजेत्या राणीने ब्राझीलच्या बेट्रिझ सोआरीसचा पराभव केला. वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेत राणीने रौप्यपदक जिंकले होते.

माजी कनिष्ठ विश्वविजेती निखात झरीन (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), आशियाई रौप्यपदकविजेता सुमित सांगवान (९१ किलो) आणि वहलिमपुया (७५ किलो) यांनी उपांत्य फेरीच्या लढती गमावल्यामुळे कांस्यपदक मिळाले. या चारही खेळाडूंना कोणत्याही लढतीशिवाय उपांत्य फेरीत स्थान मिळाले होते. जपानच्या साना कावानोने झरीनचा विभाजित निकालासह पराभव केला, तर जपानच्या युयटो मोरिवाकीने वहलिमपुयाचा पाडाव केला. सिमरनजीतने रिम्मा व्होलोसेन्कोचा पराभव केला, तर सुमितने एयबेक ओरलबे याला नमवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button