breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण..’; नाना पटोलेंचा फडणवीसांना टोला

भाजप आता सत्तेत येईल की नाही

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी कर्नाटक निवडणुकांच्या प्रचारावेळी पुन्हा एकदा मी पुन्हा येईन असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगवला आहे.

नाना पटोल देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की, त्यांनी, ते राज्याचे मुख्यमंत्री होते. पण मी पुन्हा येईन म्हणत आले आणि काय झाले. त्यामुळे ते काय बोलतात हे कळायला कारण नाही. काँग्रेस सत्तेतच येणार नाही असंही ते काल बोलले. मात्र, भाजप आता सत्तेत येईल की नाही हे त्यांनी आधी पहावं असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

मी पुन्हा येईन म्हणत देवेंद्र फडणवीस तर पुन्हा आले म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत तर उपमुख्यमंत्री झाले. माझ्यासारखा असता तर अखं खालच्या पदावर आलाच नसता, अशी टीका नाना पटोले यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button