breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘चिंचवडची जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी’; नाना काटे

महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज (२६ फेब्रुवारी) मतदान पार पडत आहे. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, मविआ उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत असणार आहे.

चिंचवड विधासभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज सकाळी पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.

गेल्या पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचारानंतर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला पिंपरी-चिंचवडचा शहराचा विकास आणि गेल्या पाच वर्षात भाजपने केलेला भ्रष्टाचार या मुद्द्यावरच जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि आपला विजय होईल, असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button