पिंपरी / चिंचवड

माझ्या पतीचे अपहरण करून खून केलाय : पत्नीची पोलिसात फिर्याद

खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीचे खून करण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून अपहरण केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 13) रात्री साडेनऊ वाजता खेड तालुक्यातील कोयाळी मधील काळे वस्ती येथे घडला.

लक्ष्मण शिंदे असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नीने याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील जयवंत पांढरे, कोंडीबा लहू काळे, संतोष उर्फ पिंटू लहू काळे, शिवाजी पांडुरंग कोळेकर (सर्व रा. काळे वस्ती, कोयाळी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती लक्ष्मण शिंदे आणि आरोपी यांचे 6 एप्रिल 2021 रोजी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी 13 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मण शिंदे यांना त्यांच्या घरासमोरून दुचाकीवर बसवून कोंडीबा काळे याच्या घरी नेले. तिथे आरोपींनी लक्ष्मण काळे यांचा खून करण्यासाठी अपहरण करून त्यांचा खून केला असल्याची फिर्यादी यांना खात्री असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button