breaking-newsपिंपरी / चिंचवड

दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करून स्थायी समितीची सभा तहकूब

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची आजची सभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे हे होते.

दिवंगत विद्यमान नगरसदस्य व माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन निधन झाले. माजी आमदार विलास लांडे यांचे वडिल माजी नगरसेवक विठोबा लांडे यांचे निधन झाले. संजय साळवी तसेच माजी नगरसेवक वसंतराव लोंढे यांचे चिरंजीव महेश लोंढे यांचे निधन झाले. यांना स्थायी समितीच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर आजची सभा तहकूब करण्यात आली. ही सभा शुक्रवारी (दि. १०) घेण्यात येणार आहे. सभा तहकूब करण्यात आल्याचे सभापती संतोष लोंढे यांनी जाहीर केले. यावेळी स्थायी समितीचे सदस्य, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button