breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका सफाई कर्मचा-यांना मिळणार घर; आवास योजनेसाठी 76 कर्मचारी पात्र

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत 25 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या किंवा निधन झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या वारसांना सदनिका देण्यात येणार आहेत. त्यासाठी 392 पैकी 76 कर्मचारी पात्र ठरले आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत महापालिकेत 25 वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा झालेल्या सफाई कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना मालकी तत्वावर सदनिका उपलब्ध करुन दिली जाते. या सदनिकांचे चटई क्षेत्र 269 चौरस फुट असेल.

महापालिका प्रशासनाकडून 22 ऑक्टोबर 2008 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत 25 वर्षे आणि त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचा-यांची यादी राज्य सरकारकडे पाठविण्यात आली होती. त्यात 392 कर्मचा-यांचा समावेश होता. त्यातील 291 कर्मचा-यांनी गृहकर्ज घेतलेले असून त्यांचे स्वत:चे घर आहे. तसेच, 25 कर्मचा-यांची सेवा 25 वर्ष पूर्ण झालेली नाही. अशा 316 कर्मचा-यांना अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित पात्र 76 कर्मचारी आणि त्यांच्या वारसांची यादी महापालिकेने प्रसिध्द केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button