breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भुलीचं इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीने केली आत्महत्या

मुंबई – मुंबईच्या  वरळी येथील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमबीबीएस पदवीचं शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीने आपण डॉक्टर होऊ की नाही? या चिंतेतून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिने भुलीच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस  घेऊन स्वतः ला संपवलं आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव निताशा बंगाली आहे. ती एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. आपण डॉक्टर होऊ की नाही, याची भीती सतत सतावत होती. यातूनच नैराश्यात गेलेल्या निताशाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. पण तिच्या आत्महत्येच्या नेमक्या कारणाची अद्याप पुष्टी करण्यात आली नाही. मृत निताशाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट वगैरे लिहिली आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मृत निताशा आई-वडील आणि भावासोबत वरळीतील समुद्र दर्शन इमारतीत वास्तव्याला होती. तिची आई आणि भाऊ दोघंही डॉक्टर आहेत. तर वडील एका बड्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. असं असताना मुलीने आत्महत्या केल्याने कुटुंबीयातील सर्वांनाच धक्का बसला आहे. या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का? याचा शोधही पोलिसांकडून घेतला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button