breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा राज्यात उपलब्ध होणार – राजेश टोपे

मुंबई – सध्या राज्यात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबलंय. मात्र, यावर उपया म्हणून लवकरच राज्यात स्पुतनिक लसीचे डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, “राज्यात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करायचं आहे. मात्र सध्या लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा झाली आहे. येत्या जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. मात्र सध्या कोरोना लसींचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ही चर्चा पूर्ण झाली आहे. त्यानुसार येत्या जुलै किंवा ऑगस्टमध्ये स्पुतनिक लसींचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे

केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून व्हॅक्सीन इंपोर्टचं एक स्पष्ट धोरण ठरवावं. तसेच याला इतर राज्यांना मदत करावी. तसेच ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही, असेही राजेश टोपे म्हणाले.

तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button