Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार; वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून फडणवीसांनी दिली ग्वाही

मुंबई : वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी चर्चा करावी लागणार आहे. त्यासाठी होळकर यांनी पैसे दिले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून, वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्ट वाद केलाच पाहिजे का? तर असे काही नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आज तुळजापूर आणि पंढरपूर येथील मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून वाद निर्माण करून काहीही होणार नाही. धनगर समाज एकीकडे आणि मराठा समाज एकिकडे हे कशासाठी? हे अतिशय अयोग्य आहे. या विषयावर बसून मार्ग काढता येईल, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –  ‘कृषी क्षेत्राच्या विकासात भारताची प्रगती’; शैलेंद्र देवळाणकर

या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संभाजी महाराज यांना अनेक वेळा भेटण्याची वेळ दिली आहे. ते माझ्याशी फोनवर देखील बोलतात. ते मला येऊन देखील भेटतात. त्यामुळे त्यांना वेळ न देण्याचे काहीही कारण नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मृती स्थळावरून युवराज संभाजीराजे यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची वेळ मागितली असून त्यांची वेळ मिळाली नसल्याचे म्हटले होते. मात्र ते मला कधीही भेटू शकतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा दावा फेटाळला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button