बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर; जाणून घ्या संपूर्ण संघ..

Border Gavaskar Trophy 2024 | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार असून यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियात केएल राहुललाही संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह संघाचा उपकर्णधार असेल.
भारतीय संघाने अभिमन्यू इसवरन आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी दिली आहे. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही स्थान मिळवण्यात यश आले. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यासोबत केएल राहुलला देखील संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात सामील करण्यात आले आहे. भारतीय संघाने सर्फराज खानलाही संधी दिली आहे.
हेही वाचा – शंकर जगताप यांच्या महाविजयासाठी रहाटणी-सांगवी मंडलाच्या पदाधिकाऱ्यांचा ‘मास्टर प्लॅन’!
वेगवान गोलंदाजांची तगडी फळी- जसप्रीत बुमराहसह मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. भारताने मुकेश कुमार आणि नवदीप सैनी तसेच खलील अहमद यांची राखीव खेळाडू म्हणून निवड केली आहे. तर फिरकीपटूमध्ये वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.





