ताज्या घडामोडीमुंबई

या’ स्टॉकने ५ वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले

मुंबई | आजारामुळे दबावाचा सामना करत असतानाही भारतीय शेअर बाजारानं (Indian Share Market) आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स (Share Market Returns) मिळवून दिले आहेत. सेंकडरी मार्केटमधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येनंही बाजाराला मोठा हातभार लावला आहे. 2020-21 या काळात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मल्टिबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock) होते. ज्यामध्ये अनेक पेनी स्टॉक्सचादेखील (Penny Stock return) समावेश आहे.

सिंधू ट्रेड लिंक्सचा (Sindhu Trade Links) स्टॉक हा असाच एक स्टॉक आहे. बीएसईवर (BSE listed stock) सूचीबद्ध केलेल्या या स्टॉकनं गेल्या एका वर्षात 1750 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स मिळवून दिले आहेत. परंतु, ही काही पहिलीचं वेळ नव्हती. अल्फा रिटर्न्स देण्याचा या स्टॉकचा इतिहासच आहे. गेल्या पाच वर्षांत सिंधू ट्रेड लिंक्सच्या शेअरच्या किंमतीमध्ये 1.69 रुपयांपासून 132.10 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षात गुंतवणूकदारांना सात हजार 700 टक्के रिर्टन्स मिळाले आहेत.

गेल्या महिनाभरात हा स्टॉक 121.50 रुपयांवरून 132.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणं, गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 14.87 रुपयांवरून 132.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकनं सहा महिन्यांत 800 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या वर्षभरात, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Stock) 7.11 रुपयांवरून 132.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. एक हजार 750 टक्क्यांची ही वाढ आहे. त्याचप्रमाणं पाच वर्षात हा स्टॉक 1.69 रुपयांवरून 132.10 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत त्यात 78 पटीनं वाढ झाली आहे.

आपण या शेअरची प्राइस हिस्ट्री पाहिल्यास, जर एखाद्या गुंतवणूकदारानं एका महिन्यापूर्वी या स्टॉकमध्ये एख लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला एक लाख 10 हजार रुपये रिटर्न मिळाले असते. तर, सहा महिन्यांपूर्वी जर कोणी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याला नऊ लाख रुपये मिळाले असते. याशिवाय, जर एखाद्यानं एका वर्षापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला 18 लाख 50 हजार रुपये रिटर्न मिळाले असते. त्याचप्रमाणं, जर एखाद्यानं पाच वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याला 78 लाख रुपये मिळाले असते.

सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेड ही ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक्स सेक्टरमधील मेजर प्लेअर आहे. या कंपनीची सध्याची मार्केट कॅप 6 हजार 790 कोटी रुपये इतकी आहे. त्याचा ट्रेड व्हॉल्युम सुमारे दोन लाख रुपये आहे. जे त्याच्या 20 दिवसांच्या सरासरी 1.70 लाख रुपये व्हॉल्युमपेक्षा खूप जास्त आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांतील नीचांक 5.32 रुपये इतका आहे तर 166.20 रुपये हा 52 आठवड्यातील उच्चांक आहे. सिंधू ट्रेड लिंक्स लिमिटेडचा इतिहास आणि सध्याची स्थिती पाहता, गुंतवणुकीसाठी ही कंपनी एक चांगला पर्याय ठरू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button