Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
कुणीच वाचलं नसतं! चक्रीवादळात मृत्यूला स्पर्शून आलेल्यांच्या अश्रूंचा बांध फुटला
मुंबई |
प्रचंड वेगाने वाहणारे वारे. खळवलेल्या समुद्र आणि सहा ते आठ मीटर उंचीच्या जीवघेण्या लाटा. अगदी मृत्यूच चाल करून येतोय असं वाटावं. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात असताना अरबी समुद्रात हे दृश्य होतं, ‘बॉम्बे हाय’ परिसरातील. तराफ्यांवर असलेल्या लोकांना एकाच वेळी मृत्यूने चौहीबाजूंनी जणू वेढाच दिला होता. त्यात तराफाच भरकटला आणि बुडायला लागला.
तराफ्यावरील लोकांच्या पायाखालून जमीनच सरकरली. पण तरीही धीर न सोडता त्यांनी तब्बल ११ तास संकटाशी लढा दिला आणि सुखरूप बाहेरही पडले. पी-३०५ तराफ्यावरील कर्मचारी किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला.
वाचा- महाराष्ट्रालाही तौतेचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?- नवाब मलिक





