Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
शेअर बाजारात सेन्सेक्सने ओलांडला ६२०००चा टप्पा
मुंबई – दसऱ्यानंतर शेअर बाजारात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. त्यानंतर आज पुन्हा एका शेअर बाजार नव्या उच्चांकासह उघडला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३९०.८९ अंकांसह ६२,१५६.४८ वर उघडला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीचादेखील १८,६०२.३५च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरू झाला.
दरम्यान, काल सेन्सेक्स ५११.३७ अंकांनी वाढून प्रथमच ६१,८१७.३२च्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. त्याचवेळी निफ्टीदेखील वाढीसह उघडला आणि १३०.२० अंकांच्या वाढीसह १८,४६८.७५ वर बंद झाला होता.





