Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीमुंबई
अरेरे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला महिलांना अंगठे दाखविणे पडले महागात… शिवसैनिक महिलांनी दिला चोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Shivsena-Activitis-beaten.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
अरेरे, शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला महिलांना अंगठे दाखविणे पडले महागात… शिवसैनिक महिलांनी दिला चोप
नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
दसरा मेळाव्याला जाताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महिला तसेच एकनाथ शिंदे गटाच्या पुरुष कार्यकर्त्यांमध्ये इगतपुरी घोटी परिसरात राडा झाला. यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना महिलांकडून चोप देण्यात आला.
नाशिक-इगतपुरी रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. वाहनात बसून हा कार्यकर्ता या महिलांना अंगठे दाखवत असल्याचा आरोप करत या महिलांनी त्या कार्यकर्त्याला गाडीतून बाहेक ओढण्याचा प्रयत्न केला. तसेच गाडी फोडण्याची धमकी दिली. मात्र मुंबईला दसरा मेळाव्याला पोहोचायला विलंब होईल म्हणून हा वाद उरकता घेत महिलांनी त्याला सोडून दिले.