Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, उद्या होणार शस्त्रक्रिया

 

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात  करदाखलण्यात आले आहे. [clear]उद्या सोमवारी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडणार आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रास जाणवला होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर एन्डोस्कॉपी करून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी सात दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एक शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांसोबत त्यांची पत्नी, मुलगी सुप्रिया सुळे आणि जावईसोबत आहे.

“शरद पवारांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे,” अशी माहिती तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button