मुंबईत खासगी आणि सार्वजनिक धुलिवंदन खेळण्यास मनाई, पालिकेची नियमावली जारी
![Prohibition on playing private and public Dhulivandan in Mumbai, Municipal Rules issued](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/holi2012.jpg)
मुंबई – मुंबईसह आजूबाजूच्या शहरी भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मृत्यदर कमी झाला असला तरी रुग्णवाढीचा वेग मात्र वाढला आहे. त्यामुळे येत्या धुलीवंदनाला मुंबईकरांना साध्या पद्धतीने होळी साजरी करावी लागणार आहे. होळी आणि धुलीवंदन साजरे करण्यासाठी मुंबई पालिकेने नियमावली जाहीर केेली आहे. त्यानुसार, सार्वजनिकरित्या होळी साजरी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
वाचा :-कोरोनाच्या उद्रेकानंतर केंद्राकडून नवी नियमावली, ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू
मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी
मुंबईत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि धूलिवंदन/ रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात येत आहे. तसेच मी जबाबदार या मोहिमेतंर्गत वैयक्तिरित्याही हा सण साजरा करणे टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खाजगी किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे.
व्यापारांचे नुकसान होण्याची शक्यता
त्यामुळे यंदाही कोरोनापूर्वी साजऱ्या केल्या जाणाऱ्या होळीवर निर्बंध येणार आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसण्याची शक्यता आहे. या निर्बंधामुळे अनेक दुकानात शुकशुकाट पहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.5 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 53 हजार 589 जणांचा मृत्यू झाला आहे.